ग्राहक देवो भव: तुमचा ग्राहक हीच तुमच्या व्यवसायाची खरी संपत्ती असतो.

ग्राहक देवो भव: तुमचा ग्राहक हीच तुमच्या व्यवसायाची खरी संपत्ती. कोणत्याही व्यवसायात ग्राहक देवासमान सांगितला आहे. तुमचा ग्राहक हीच तुमच्या व्यवसायाची खरी संपत्ती असतो.

Nov 22, 2023 - 00:11
Nov 27, 2023 - 11:16
 0  20
ग्राहक देवो भव: तुमचा ग्राहक हीच तुमच्या व्यवसायाची खरी संपत्ती असतो.

कोणत्याही व्यवसायात ग्राहक देवासमान सांगितला आहे. तुमचा ग्राहक हीच तुमच्या व्यवसायाची खरी संपत्ती असतो. त्यामुळे ग्राहकांशी नेहमीच चांगलं नातं कसं ठेवता येईल याचा विचार करा. त्यांच्या सोबत चांगलं नातं जोडा. ही एका यशस्वी व्यवसायाची किल्ली आहे. असे केल्यामुळे तुमच्या व्यवसायात वाढ होणारच. तुमची सतत तुमच्या ग्राहकाच्या संपर्कात असणे आणि तो जी आपले उत्पादन अथवा सेवा वापरात असेल तर त्या बद्दल त्याची विचारपूस करणे अधिक योग्य ठरते. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी तुमच्या ग्राहकाला भेटा, फोन करा अथवा एकदा ईमेल करा. तुमचा व्यवसाय नुकताच सुरू झालेला असो वा दीर्घकाळापासून चालत आलेला असो, तुमच्या उद्योगाची वृद्धी ही मात्र तुमचं तुमच्या ग्राहकांशी असलेल नातच ठरवत असते.

सर्वात प्रभावशाली असे हे व्यवसायाचे अस्त्र आहे. ग्राहकाला त्याच्या जन्मदिनादिवशी शुभेच्छा देणारा ईमेल पाठवू शकता. पण ग्राहकाच्या संपर्कात राहण्यासाठी ग्राहकाची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा तुमच्या कडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची पूर्ण माहिती तुम्ही तुमच्याकडे साठवून ठेवा. ह्या माहितीची म्हणजेच डेटाबेसची हल्लीच्या युगात फार मोठी किमया आहे. विद्यमान ग्राहक आपल्या व्यवसायाचे आधारस्तंभच असतात. आताच्या तंत्रज्ञानामध्ये न्यूजलेटर चा प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्राहकांचा डेटाबेस अपडेट ठेवणे गरजेचे आहे.

तुम्ही आमच्यासाठी खूप महत्वाचे आहात याची जाणीव त्यांना करून देणे गरजेचे असते. आपल्या व्यवसायातलं त्याचं स्थान किती बहुमूल्य आहे, हे त्यांना कळवा. त्यांना काही सवलती द्या किंवा भेटवस्तूपाठवा. अश्याने ग्राहक समाधानी होतो आणि आपल्याकडेच टिकून राहतो. त्यांना चांगली सेवा द्या, माहिती द्या, संपर्क वाढवा, प्रसंगी सल्ला विचारा. तुम्ही त्यांच्या जवळचे बना. जणू त्यांच्या कुटुंबाचा तुम्ही एक भागच आहात. म्हणूनच प्रत्येक ग्राहकाशी दीर्घकालीन नातं निर्माण कसे करता येईल ह्याकडे लक्ष द्या.