व्यवसायासाठीचे प्रभावी माध्यम: जाहिरात

आपण व्यवसाय करत असताना लहान लहान गोष्टींचा देखील विचार करतो. आपण कुठल्याच बाबतीत कमी पडायला नको असे प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असते. Why advertising important in Marathi.

Nov 22, 2023 - 00:06
Nov 27, 2023 - 11:28
 0  12
व्यवसायासाठीचे प्रभावी माध्यम: जाहिरात

आपण व्यवसाय करत असताना लहान लहान गोष्टींचा देखील विचार करतो. आपण कुठल्याच बाबतीत कमी पडायला नको असे प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असते. त्यासाठी तो अतोनात कष्ट सुद्धा घेतो. मेहनतीने, ग्राहकांना योग्य सेवा दिलेला हा व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवावा आणि त्यातून आपल्या व्यवसायाला जास्तीचा नफा व्हावा असे प्रत्येक व्यावसायिकाला वाटणे सहाजिकच आहे. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि व्यवसाय कोणताही असो अथवा कितीही जुना असो प्रत्येक व्यवसायाला जाहिरातीची नितांत आवश्यकता असतेच असते. माझा व्यवसाय प्रस्थापित आहे मला जाहिरातीची काय गरज? असे वाटणे स्वाभाविक आहे. पण आपण ह्या पलीकडे जाऊन विचार करणे गरजेचे आहे.


लक्षात घ्या जाहिरात ह्या माध्यमात बरेच प्रकार आहेत. काही जाहिराती ह्या माल विकला जावा ह्या कारणासाठी, काही आपली सेवेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा ह्या साठी तर काही जाहिराती ह्या फक्त लोकांच्या समोर आपल्या व्यवसायाचे नाव रहावे आणि जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा त्यांनी आपल्याला संपर्क साधावा ह्या कारणासाठी केली जाते. उदाहरण देयचे झाले तर आपण टी.व्ही पाहताना अनेक जाहिराती आपल्याला दाखवल्या जातात. त्या जाहिराती पाहून आपण लगेचच टी.व्ही बंद करून कोणती वस्तू आणायला जात नाही. तर आपण ते लक्षात ठेवून जेव्हा आपल्याला गरज भासेल तेव्हाच खरेदी करतो. गुगल हे नाव आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. जर आपण प्रत्येक मिनिटाला गुगल वापरत असू तर अश्या व्यवसायाला जाहिरातीची काय गरज? पण तरी सुद्धा रस्त्यातून जाताना, टी.व्ही वर आपण गुगल किंवा फेसबुक ची जाहिरात पाहतोच कि.. अश्या प्रकारच्या जाहिरातीचा उद्देश्य त्यांच्या नवीन सेवांविषयी आपल्याला माहिती देणे एवढाच असतो.


कालानुरूप जाहिरात ह्या क्षेत्रात असामान्य बदल होत गेले. सायकल वर जाता जाता एखादा व्यक्ती ओरडून व्यवसायाची जाहिरात करण्यापासून ते आत्ता गुगल किंवा डिजीटल स्वरूपातील जाहिरातीपर्यंत. आपल्यापैकी अनेक जणांचा हा गैरसमज आहे कि, व्यवसायाची वेबसाईट ही सुद्धा जाहिरात आहे. वेबसाईट ही तुमच्या व्यवसायाची माहिती जगासमोर ठेवण्याचे एक मध्यम आहे. पुढील काही लेखांमधून आपण वेबसाईट बद्दल अधिक माहिती घेणार आहोतच. पण आत्ता एवढेच लक्षात घ्या कि वेबसाईट ही एक माहिती पोचविण्यासाठी तयार केले गेलेले माध्यम आहे.


जाहिरात कशी असावी, जाहिराती साठी कोणती माध्यमे उपलब्ध आहेत आणि त्यांची कार्यपद्धती विषयी आपण पुढील लेखात जाणून घेऊ..