कोणत्या न कोणत्या गरजेनुसार सुरु होणारे गृह उद्योग : एक पहिले पाऊल

आपल्या देशात उद्योग क्षेत्रात स्त्रियांना प्रचंड वाव आहे. आताच्या काळाची गरज पाहता स्त्रियांनी व्यवसायाकडे जास्तीत जास्त वळाले पाहिजे.

Nov 22, 2023 - 00:12
Nov 27, 2023 - 11:33
 0  26
कोणत्या न कोणत्या गरजेनुसार सुरु होणारे गृह उद्योग : एक पहिले पाऊल

उद्योग क्षेत्रातील महत्वाचा घटक म्हणजे गृह उद्योग. आपण आजवर गृह उद्योगाविषयी खूप काही ऐकले असेल. गृह उद्योग म्हणजे असा उद्योग कि जो घरबसल्या करता येतो. प्रामुख्याने गृह उद्योगात स्त्रियांचा सहभाग हा जास्त प्रमाणात आढळतो. एखाद्या स्त्री साठी उद्योजिका होण्याचा मार्ग हा गृह उद्योगापासून जातो असे आपण म्हणू शकतो. गृह उद्योग फक्त स्त्रियाच करू शकतात असाही एक गैरसमज आपण करून घेतला आहे. पण ह्या क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे हे मात्र आपण नाकारू शकत नाही.

कोणत्याही व्यवसायाचा पाया म्हणजेच "आत्मविश्वास"

आपल्या देशात उद्योग क्षेत्रात स्त्रियांना प्रचंड वाव आहे. आताच्या काळाची गरज पाहता स्त्रियांनी व्यवसायाकडे जास्तीत जास्त वळाले पाहिजे. आजच्या स्त्रिया स्वत:ला वेगवेगळ्या क्षेत्रात सिद्ध देखील करत आहेत. व्यावसायाभिमुख अभ्यासक्रमांकडे मुलींचा ओढा वाढतोय ही समाधानकारक बाब नक्कीच आहे. घर, संसार, मुलं या सर्वांची जबाबदारी सांभाळत व्यवसायात उतरताना काही गोष्टी स्त्रियांनी जाणून घेणे गरजेचे आहे.

गृह उद्योग हे कोणत्या न कोणत्या गरजेनुसार सुरु झाले असतात.. उदा. घ्यायचं झालं तर अत्तरे तयार करणे, मेणबत्ती बनवणे, साबण बनवणे, घरगुती मसाल्यांना सुद्धा चांगली मागणी असल्याने ते बनवणे, छंद वर्ग किव्वा शालेय अभ्यासक्रमाचे वर्ग सुरु करणे, ज्वेलरी तयार करणं, माशांची शेती, एक ना अनेक हजारो पर्याय उपलब्ध होतात. परंतु कोणत्याही व्यवसायात उतरताना प्रथम त्या व्यवसायाचा अभ्यास करून पुढील मार्गक्रमण करता येईल.

नावात काय असते?

छोट्या उद्योगांपासून सुरुवात करून मोठे झालेले अनेक उद्योग आपल्या समोर आपण बघितले आहेत. त्यापैकीच आपल्या सर्वांना माहित असलेला ‘लिज्जत पापड’. काही महिलांनी एकत्र येऊन सुरु केलेला हा उद्योग. बघता बघता ह्याच महिला गृह उद्योगाचे स्वरूप फारच मोठे झाले आहे. आज आपल्या सर्वांच्या तोंडी पापड म्हंटल्यावर पहिले नाव येते ते "लिज्जत पापडाचे". आज महिला गृहुद्योगाला शासनाकडून सुद्धा अनुदान मिळते. महिला उद्योजकांनी त्याचा लाभ घेऊन आपला व्यवसाय हा वाढवायला हवा.

कोणताही उद्योग अथवा व्यवसाय आपण जेव्हा चालू करतो तेव्हा आपल्या मनामध्ये आपला व्यवसाय कसा वाढवायला हवा तसेच आपल्या व्यवसायाच्या ध्येय धोरणाचा आपण विचार करतो आराखडे बनवतो. आपला व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे असते. आणि ह्याच साठी आपल्याला व्यवसायाची स्ट्रॅटेजी बनवणे गरजेचे असते. व्यावसायिक धोरणामध्ये कंपनीचं काय ध्येय आहे, आपण ते ध्येय कसं पूर्ण करणार आहोत अथवा ते ध्येय पूर्ण करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे आणि त्या अडचणीतून कसा मार्ग कसा काढू शकतो अशी सर्व माहिती त्या व्यावसायिक धोरणामध्ये मध्ये असते.