महाराष्ट्राचे राज्यगीत: जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत राज्यगीत म्हणून लागू करण्यात आले. महाराष्ट्राची महती सांगणारं आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारं 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत आहे.

Nov 16, 2023 - 12:57
Nov 16, 2023 - 13:02
 0  14
महाराष्ट्राचे राज्यगीत: जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
https://maharashtra.gov.in

शाहीर साबळे यांनी गायलेलं 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं गीतकार राजा बढे यांनी लिहिलं आहे. तर श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून ह्या मूळ गीतामधील दोन चरणांचे गीत “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून स्वीकारण्यात आले. हे राज्यगीत 1.41 मिनिट अवधीचे आहे. महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात आले.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा॥२॥


राज्यगीत गायन, वादना संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत लिंक वर वाचू शकता.