इंग्रजीमध्ये आलेले ईमेल आणि एस.एम.एस. मराठीमधून वाचा

मायक्रोसॉफ्टने आउटलुक च्या माध्यमातून आता तुम्ही तुम्हाला येणारे ईमेल आणि एस.एम.एस. मराठीमधून वाचू शकाल. ह्या बद्दल आपण अधिक सविस्तर पणे जाणून घेऊया.

Nov 21, 2023 - 18:24
 0  16
इंग्रजीमध्ये आलेले ईमेल आणि एस.एम.एस. मराठीमधून वाचा
Image Credit: Microsoft

मायक्रोसॉफ्टने आउटलुक च्या माध्यमातून आता तुम्ही तुम्हाला येणारे ईमेल आणि एस.एम.एस. मराठीमधून वाचू शकाल. ह्या बद्दल आपण अधिक सविस्तर पणे जाणून घेऊया.

तंत्रज्ञानातील दिग्गज समजली जाणारी मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांच्या आउटलुक लाइट ह्या सोफ्टवेअर मध्ये मराठी भाषेसोबतच अन्य भारतीय भाषांचा समावेश केला आहे. ह्या सोफ्टवेअर च्या मदतीने आपण आपल्याला आलेले अन्य भाषेतील ईमेल आणि एस.एम.एस मराठी मध्ये वाचू शकाल. त्याच सोबत व्हॉइस टायपिंग आणि भाषांतर वैशिष्ट्यासह ह्याच्या मदतीने आपण मराठीमध्ये ईमेल सहज लिहू शकणार आहात.

सध्या हे सध्या हे अॅप मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध आहे.भविष्यात मायक्रोसॉफ्ट इतर भाषांचा देखील सामावेश करू शकते असे सांगण्यात येते.

हे अॅप सध्यातरी फक्त ईमेल भाषांतरापुरते मर्यादित असले तरी, भविष्यात ह्या अॅप चे वापरकर्ते एसएमएसचे भाषांतर देखील करू शकतील. हे फीचर सुरू केल्यानंतर यूजर्स त्यांच्या आवडत्या भाषेत ईमेल सारखा कोणताही एसएमएस लिहू आणि वाचू शकतील. देशाच्या विविध भागांतून आलेल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी भाषांतर वैशिष्ट्य अतिशय उपयुक्त आहे.