वेबसाईट: तुमच्या व्यवसायाचा डिजीटल प्रतिनिधी

जर तुम्हाला तुमचा व्यवसाय जागतिक स्तरावर नेयचा असेल तर वेबसाईट शिवाय पर्याय नाही. तुलनेनी कमी खर्चात तुमच्या उद्योगाची ख्याती जगात पसरविण्याचे एकमात्र प्रभावी माध्यम म्हणजे वेबसाईट.

Nov 22, 2023 - 00:07
Nov 27, 2023 - 11:37
 0  11
वेबसाईट: तुमच्या व्यवसायाचा डिजीटल प्रतिनिधी

आजचे युग हे डिजीटल युग आहे. ह्या युगाने अनेक नवनवीन गोष्टी आपल्याला दाखवल्या. सर्व जग आधुनिकतेकडे वाटचाल करायला लागले तो काळ म्हणजे साधारणपणे १९८५ चा. आपल्या पैकी खूप कमी लोकांना माहित असेल कि, जगातल्या पहिल्या वेबसाईट चे नाव म्हणजेच डोमेन रजिस्टर झाले ते १५ मार्च १९८५ साली Symbolics.com या नावाने. हल्लीच्या काळात डोमेन नेम म्हणजे तुमच्या व्यवसायाची डिजीटल ओळख. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय जागतिक स्तरावर नेयचा असेल तर वेबसाईट शिवाय पर्याय नाही. तुलनेनी कमी खर्चात तुमच्या उद्योगाची ख्याती जगात पसरविण्याचे एकमात्र प्रभावी माध्यम म्हणजे वेबसाईट. 

आता ह्या वेबसाईट साधारणतः कोणत्या प्रकारच्या असतात ते देखील पाहूया:-

  • Static Website
  • Dynamic Website
  • E-Commerce Website


सर्वप्रथम आपण वेबसाईट साठी कोणत्या गोष्टींची आवशक्ता आहे ते पाहूया.

कोणतीही वेबसाईट असुद्या त्या वेबसाईट साठी सर्वप्रथम एक डोमेन नेम लागते. प्रत्येक वेबसाईटला एक वेगळे डोमेन नेम असते. कोणत्याही दोन वेबसाईट चे डोमेन नेम सारखे नसते. हे डोमेन नेम म्हणजेच तुमच्या व्यवसायाची ओळख होते. डोमेन नेम एक्सटेन्शन हे अनेक प्रकारचे असू शकतात. उद्या.  .कॉम, .इन, .ओआरजी इत्यादी... आपल्या व्यवसायाला कोणते योग्य आहे हे आपल्याला वेबसाईट ह्या विषयातील तज्ञ व्यक्ती सांगू शकतील. परंतु जर आपण व्यवसाय करत असाल तर आपल्याला .com किंवा .in / .co.in हे चालू शकतात. तुम्ही देखील तुमच्या व्यवसायाचे डोमेन नेम सर्च करू शकता. त्यासाठी ह्या वेबसाईट ला भेट द्या: https://www.godaddy.com/en-in
वेबसाईट चे प्रकार तर आपण पहिले आता आपण नेमक्या कोणत्या प्रकारात आपली वेबसाईट तयार करायची ते पाहूया.

Static Website : 

या प्रकारामध्ये वेबसाईटची बनावट ही Static स्वरूपात असते. Static वेबसाईट मधील वेब पेजेस चा HTML कोड हा वेब सर्व्हरमध्ये साठवलेला असतो. वेबसाईटवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेबसाईट ही सारखीच दिसते. ह्यात जर तुम्हाला बदल करावासा वाटला तर तो तुमचा वेब डेव्हलपर करून देऊ शकतो.

Dynamic Website (CMS Website) :

जर तुमच्या वेबसाईट वरची माहिती ही सतत बदलणारी असेल तर तुम्ही अश्या प्रकारची वेबसाईट बनवू शकता. इंग्रजी मध्ये यालाच Content Management System असे म्हणतात. ज्या मध्ये तुम्हाला एक लॉगिन दिले जाते आणि त्या आधारे तुम्ही तुमच्या वेबसाईटची माहिती कधीही केव्हाही बदलू शकता.

 E-commerce Website :

ह्या वेबसाईटची गरज तुम्हाला तुमचे उत्पादन ऑनलाइन विकायचे असेल तरच होऊ शकते. ह्या प्रकारच्या वेबसाईट मध्ये आज पर्यंत अनेक कंपनी आल्या. उदा. Flipkart, Amazon इत्यादी. तर साधारण अश्या पद्धतीने आपण आपली वेबसाईट बनवू शकतो. इथे आम्ही आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो कि, तुम्ही तुमची वेबसाईट ही त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती किंवा संस्थेकडून बनवून घ्या. कोणत्याही अश्या व्यक्ती कडून वेबसाईट बनवू नका जीला ह्या क्षेत्रातील अनुभव नाही. फसवेगिरी पासून सावध रहा. कमी पैशात वेबसाईट तयार करून देण्याच्या अमिषाला बळी न पडता चांगल्या संस्थेकडून आपली वेबसाईट तयार करून घ्या. शेवटी वेबसाईट ही आपल्या व्यवसायाचे प्रतिनिधीत्व करत असते.