व्यवसायासाठी सोशल मिडीया चा प्रभावीपणे वापर करा

आजचे युग हे डिजीटल युग आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन माध्यम हे व्यवसायासाठी जास्त सरस ठरताना आपण पहात आहोत.

Nov 22, 2023 - 00:08
Nov 27, 2023 - 11:18
 0  13
व्यवसायासाठी सोशल मिडीया चा प्रभावीपणे वापर करा

आजचे युग हे डिजीटल युग आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन माध्यम हे व्यवसायासाठी जास्त सरस ठरताना आपण पहात आहोत. ह्या ऑनलाईन माध्यमात जाहिराती साठी सर्वात लोकप्रिय असणारे माध्यम म्हणजे सोशल मिडीया. त्यामुळेच आज आपण सोशल मिडीयाचा वापर आपण आपल्या व्यवसायासाठी कसा करता येईल हे पाहणार आहोत.

तुम्हाला माहित आहेच को सोशल मिडिया मध्ये फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन, युट्युब आणि अशी बरीच माध्यमे आहेत. वरील माध्यमांचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे हे जास्त प्रचलित आहेत. व्यवसायासाठी अश्या प्रकारच्या माध्यमांचा वापर आपण प्रभावीपणे कृ शकलो तर आपल्या व्यवसायाची प्रगती ही जोमात होईल ह्यात शंका नाही. प्रत्येकाचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. सोशल मिडीया म्हणजे सगळीकडे एकाच वेळी प्रसिद्धी करायची असे नाही. आपल्या व्यवसायासाठी कोणते माध्यम उपयोगी आहे हे मात्र आपल्याला कळायला हवे. पण ह्याची चिंता करायची गरज नाही. आज ह्या साठी अनेक तज्ञ लोकं आहेत. जे आपल्याला आपल्या व्यवसायासाठी कोणते माध्यम उत्तम राहील याची माहिती देतील. लक्षात घ्या तुम्ही तुमच्या व्यवसायावर लक्ष केंदित करा. बाकीचे काम हे त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींवर सोपवा.

ह्या लेखात आपण प्रत्येक माध्यमाची सविस्तर माहिती पाहण्यापेक्षा एकूणच सोशल मिडिया चा वापर आपण कसा करू शकतो हे पाहुयात.

प्रत्येक सोशल मिडीयाचा वापरकर्ता हा वेगवेगळा आहे. त्यानुसार आपल्या व्यवसायाला कोणते माध्यम उचित आहे ते पहावे. उदा. जर मर्सिडीज ह्या कंपनीने त्यांची कार ही फेसबुक सारख्या मार्केट प्लेस मध्ये विकायला ठेवली तर त्या कंपनीच्या विक्रीत वाढ होईल का? तर नाही. कारण फेसबुक वापरणारा व्यक्ती हा फेसबुक वर खरेदी करण्यसाठी आलेला नाही तर तो मनोरंजन अथवा कोणतीतरी माहिती मिळवण्यासाठी आला आहे. पण जर एखाद्या लघु उद्योगाने किंवा गृह उद्योगाने जर त्यांची जाहिरात फेसबुक वर केली तर त्याची विक्री होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे फेसबुकचा वापर हा तुमच्या ग्राहकाशी संपर्क ठेवण्य्साठी केला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. तुम्ही नेहमीच तुमच्या ग्राहकांशी जोडले जाल.

इंस्टाग्राम: आता आपण ह्या माध्यमाविषयी माहिती घेऊ. आता इंस्टाग्राम वापरणारा वर्ग पहिला तर तो युवा वर्ग अधिक आहे. त्यामुळे जर तुमचे उत्पादन हे युवा वर्गासाठी असेल तर तुम्ही ह्या माध्यमाचा अतिशय  हुशारीने वापर करून घेऊ शकता. ह्या माध्यमावर जर तुम्ही Industrial Capacitor विकायला लागलात तर तुम्हाला किती प्रतिसाद येईल? इथे तुम्ही एखाद्या शूज ची किंवा टी-शर्ट ची जाहिरात करू शकता. आपल्याला वारंवार सांगावेसे वाटते कि, आज ह्या साठी अनेक तज्ञ लोकं आहेत. जे आपल्याला आपल्या व्यवसायासाठी कोणते माध्यम उत्तम राहील याची माहिती देतील. लक्षात घ्या तुम्ही तुमच्या व्यवसायावर लक्ष केंदित करा. बाकीचे काम हे त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींवर सोपवा.

ट्विटर: हे माध्यम अतिशय प्रभावशाली आहे. जर आपले आपल्या व्यवसायाशी निगडीत काही विचार असतील कि जे समजा समोर आले पाहिजेत असे तुम्हाला वाटते तर त्या साठी हे माध्यम खुपच प्रभावशाली आहे. तुमचे विचार, तुमच्या समाजाप्रती असणाऱ्या भावना तुम्ही जर ट्विटर च्या माध्यमातून जगासमोर आणल्यात आणि जर का त्या लोकांना पटल्या तर तुम्हाला फॉलो करणाऱ्यांची संख्या वाढेल.

लिंक्डइन: तुम्हाला तुमचे व्यावसायिक संपर्क वाढवायचे असतील तर तुम्ही ह्या माध्यमाचा वापर करू शकता. तुम्हाला तुमच्या स्व:ता चे व तुमच्या व्यवसायाचे एक प्रोफाईल तयार करावे लागेल. मात्र हे प्रोफाईल वेळोवेळी अपडेट ठेवणे गरजेचे आहे. ह्यामधून तुम्ही तुंचे व्यावसायिक संपर्क वाढवू शकाल आणि त्याचा फायदा तुमच्या व्यवसायाला मिळेल. इंस्टाग्राम वर आपण Industrial Capacitor विकू शकत नाही परंतु ह्या माध्यमाद्वारे आपण Industrial Capacitor ची जाहिरात करू शकता. कारण लिंक्डइन वाप्र्वारा वर्ग जो आहे तो त्याच्या व्यवसायासाठी निर्णय घेणारा व्यक्ती आहे. जो प्रोफेशनल आहे. लिंक्डइन वर तुमचे जेवढे जास्त कनेक्शन्स असतील तेवढा तुमच्या व्यवसायाला फायदा होईल.

युट्युब: तुमच्या व्यवसायाची व्हिडियो प्रोफाईल जर तुम्ही केली आसेल किंवा तुमच्या ग्राहकांच्या तुमच्या उत्पादनाविषयी किंवा सेवांविषयी प्रतिक्रिया तुमची घेतल्या असतील तर त्या व्हिडियो स्वरुपात तुम्ही युट्यूब वर अपलोड करू शकता. ह्याच प्रतिक्रिया बघून इतर ग्राहक वर्ग तुंच्या व्यवसायाकडे येईल आणि तुमचे उत्पादन किंवा सेवांचा लाभ घेईल.

असे हे सोशल मिडिया चे माध्यम. चला तर मग आजपासून ह्या सोशल मिडीया चा प्रभावीपणे वापर करुयात आणि आपला व्यवसाय वाढवूयात..