व्यवसायासाठी कर्ज: एक संधी

प्रत्येक व्यावसायिका समोर हा प्रश्न कधी ना कधी येतोच. कोणताही व्यवसाय हा लहानातून मोठा होत असतो. व्यवसायिकामध्ये जशी जिद्द, चिकाटी, मेहनत असे गुण असावे लागतात अगदी त्याच प्रमाणे एखाद्या व्यवसायाला जोड लागते ती म्हणजे कर्जाची.

Nov 22, 2023 - 00:08
Nov 27, 2023 - 11:20
 0  11
व्यवसायासाठी कर्ज: एक संधी

प्रत्येक व्यावसायिका समोर हा प्रश्न कधी ना कधी येतोच. कोणताही व्यवसाय हा लहानातून मोठा होत असतो. व्यवसायिकामध्ये जशी जिद्द, चिकाटी, मेहनत असे गुण असावे लागतात अगदी त्याच प्रमाणे एखाद्या व्यवसायाला जोड लागते ती म्हणजे कर्जाची. व्यवसायात प्रगती करायची असेल तर आर्थिक बाजू भक्कम असणे अनिवार्य आहे. जर कोणाकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर व्यवसायिक नक्कीच विचार करतात की व्यवसाय कर्ज कसे घ्यावे? कोणाकडून घावे जेणेकरून आम्ही आमचा व्यवसाय सुरू करू शकू? जरी एखाद्या व्यक्तीने कर्ज न घेता आपला व्यवसाय सुरू केला, तर नंतर त्याला त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा इतर व्यावसायिक गरजा भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागते.

व्यवसायासाठी कर्ज घेण्यापूर्वी, तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला किती खर्च अपेक्षित आहे याचे गणित जुळवले पाहिजे. प्रत्येक व्यवसायासाठी वेगवेगळी रक्कम आवश्यक असते, त्यामुळे आधी तुमचा व्यवसाय ठरवा आणि मग त्यातील गुंतवणूक बघा आणि नंतरच तुम्ही कर्ज घेऊ शकता.


जर तुम्हाला कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला त्याची संपूर्ण प्रक्रिया माहित असणे आवश्यक आहे. तुम्हाला जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्याची संपूर्ण व्यवसाय योजना बनवा. आपण हे कर्ज कसे फेडू शकतो याचे नियोजन करा. तसेच, तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचे आहे, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगा. कर्जाची संपूर्ण माहिती करून घ्या. कर्ज परतफेडीची तरतूद करून ठेवा.

आता आपण पाहूया कि, कर्जाचे प्रकार आहेत. व्यवसाय कर्जाचे दोन प्रकार आहेत:

  1. Secured (सुरक्षित) कर्ज - एखाद्या व्यक्तीला सुरक्षित कर्ज तेव्हाच दिले जाते जेव्हा ती व्यक्ती बँकेकडे काहीतरी गहाण ठेवते.
  2. Un-secured(असुरक्षित) कर्ज - असुरक्षित कर्जामध्ये काहीही तारण ठेवण्याची आवश्यकता नसते.

भारत सरकारने देखील नवनवीन व्यावसायिकाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या कर्ज योजना आणल्या आहेत. त्याची माहिती आपण पाहणार आहोत.

  1. मुद्रा कर्ज योजना
  2. प्रधानमंत्री रोजगार योजना
  3. Stand Up India
  4. Start Up India
  5. Credit Guarantee योजना 

अश्या योजनाचा सुद्धा आपण लाभ घेऊन आपल्या व्यवसायाला किंवा उद्योगाला चालना देऊ शकता. कोणत्याही कर्जाकडे हतबलता म्हणून न पाहता एक संधी म्हणून पहा आणि त्या संधीचे सोने करा.